शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

दोघे २० फूट हवेत उडाले तर दोघांना फरफटत नेलं; कारच्या धडकेत बालपणीच्या मित्रांचा भयानक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:30 IST

उत्तर प्रदेशात घडलेल्या एका भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gorakhpur Accident: उत्तर प्रदेशातून अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक भरधाव कार आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या एसयूव्ही कारने तरुणांच्या बाईकला जबर दिली आणि हा अपघात घडला. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन तरुण काही फूट हवेत उडाले तर दोघे फरफटत गेले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एसयूव्ही कार आणि बाईकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बाईकवरील चार तरुणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार चालकाचा शोध सुरू केला आहे. गोरखपूर-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. बाईकस्वार पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे दोन तरुण हवेत २० फूट उडाले तर दोन तरुण कारच्या बोनेटमध्ये अडकले. कार चालकाने त्यांना सुमारे १०० मीटर फरफटत नेले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडल्याचे सांगण्यात आलं.

या अपघात प्रदमुन कुमार, राहुल कुमार, सुनील कुमार आणि अरविंद कुमार या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेही रंगकाम करत होते आणि गावातून गोरखपूर शहरात जात होते. राहुल कुमारचे नुकतेच लग्न झाले होते. घटनेनंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

गावकऱ्यांनी सांगितले की, अरविंद एका आठवड्यापूर्वी बंगळुरूहून घरी आला होता. तो तिथे रंगकाम करायचा. ते चौघेही बालपणीचे मित्र होते. अरविंद आल्यानंतर ते चौघेही सकाळपासून एकत्र बाहेर फिरायला निघाले होते. शनिवारीही जेव्हा ते चौघेही एकाच बाईकवरून बाहेर पडले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्यांना थांबवले पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही आणि गावाबाहेर पडले. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या चौघांचाही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे. हे चारही तरुण कुटुंबासाठी पैसे कमवत होते आणि ते त्यांच्या कुटुंबियांना देत होते. त्यांच्या कमाईवरच कुटुंबाचा खर्च चालत होता. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातcctvसीसीटीव्हीGorakhpurगोरखपूर