विजय क्लबचा माशेच्या संघावर दणदणीत विजय
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30
लोलयेकर स्मृती चषक : रोहित नाईकचे शतक

विजय क्लबचा माशेच्या संघावर दणदणीत विजय
ल लयेकर स्मृती चषक : रोहित नाईकचे शतकमडगाव : रोहित नाईकच्या शानदार शतकाच्या (१३७) जोरावर विजय क्रिकेट क्लब संघाने माशे क्रिकेट क्लब संघावर १७० धावांनी विजय मिळविला. ३३ व्या नंदा जे लोलयेकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन काणकोण येथील माशे क्रिकेट क्लबतर्फे माशे येथील निराकार मैदानावर करण्यात आले होते.माशेच्या संघाने नाणेफेक जिंकून विजयच्या संघाला फलंदाजीला पाचारण केले होते. याचा फायदा उठवून संघाने रोहित नाईक १३७, सर्वानन ५५ व गोविंद लोटलीकरच्या ४६ धावांच्या जोरावर ३५ षटकांत ७ गडी गमावून २९९ धावा रचल्या होत्या. यात गोलंदाजीत माशेतर्फे तन्मय बाडकरने ४० धावांत २ गडी व सुजन लोलयेकरने एक गडी बाद केला. तर फलंदाजीत माशे क्रिकेट ३१ षटकांत १२९ धावांवर सर्वगडी बाद झाले. यात मंजूनाथ प्रसाद २८ व सुजन लोलयेकरने १८ धावा केल्या.पोळे क्रिकेट क्लब व नायल बोरी यांच्यात २८ डिसेंबर रोजी सामना खेळविण्यात येणार आहे.संक्षिप्त धावफलक : फलंदाजी विजय क्रिकेट क्लब ३५ षटकांत ७ गडी बाद २९९ धावा, माशे क्रिकेट क्लब ३१ षटकांत सर्व गडी बाद १२९ धावा. (क्रीडा प्रतिनिधी)