आज भाजप देशभरातील जनतेची पहिली पसंत बनला आहे. गेल्या दीड वर्षात देशाचा भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये, जनतेने २० वर्षांनंतरही भाजपला विक्रमी संख्येने मतदान केले. आम्ही विक्रमी जागा जिंकल्या. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील लोकांनी भाजपला सेवा करण्याची संधी दिली आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आसाममधील कालियाबोर येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांत झालेल्या निवडणुकींचे निकाल स्पष्ट आहेत. यांवरून स्पष्ट होते की, देशातील मतदाराला आता केवळ 'सुशासन' आणि 'विकास' हवा आहे. आणि भाजप विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असल्यानेच, जनता भाजपला पसंती देत आहे. याउलट, ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तेथेच काँग्रेस चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ईशान्य भारतासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 'अंतर' ही या भागातील सर्वात मोठी समस्या राहिली आहे. अंतर केवळ भौगोलिकच नाही, तर मनाचंही होतं. देशात एकाबाजूला विकास सुरू आहे आणि आम्ही मागेच राहत आहोत, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, दशकभराहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या या भागाचा विश्वास भाजपने 'डबल इंजिन' सरकारच्या माध्यमातून परत मिळवला आहे.
तसेच, रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांच्या माध्यमाने आसाम जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पूर्वी आसामचे रेल्वे बजेट केवळ २,००० कोटी रुपये होता, ते आता भाजपने वर्षाला १०,००० कोटी रुपयांपर्यंत नेले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
Web Summary : PM Modi highlighted BJP's growing popularity, citing Mumbai's BMC election victory and increased support in Maharashtra. He emphasized the party's focus on development and heritage, contrasting it with Congress' decline. Modi also spoke on improving infrastructure in Northeast India.
Web Summary : पीएम मोदी ने भाजपा की बढ़ती लोकप्रियता पर प्रकाश डाला, जिसमें मुंबई के बीएमसी चुनाव में जीत और महाराष्ट्र में बढ़ता समर्थन शामिल है। उन्होंने कांग्रेस के पतन के विपरीत, विकास और विरासत पर पार्टी के ध्यान पर जोर दिया। मोदी ने पूर्वोत्तर भारत में बुनियादी ढांचे में सुधार पर भी बात की।