सत्यपालसिंगाचा मुक्काम अन् व्यवस्थापकांचा बळी
By Admin | Updated: July 26, 2014 01:31 IST2014-07-26T01:31:26+5:302014-07-26T01:31:26+5:30
उत्तरप्रदेशचे भाजपा खासदार सत्यपालसिंग यांच्या महाराष्ट्र सदनातील शाही मुक्कामाची सोय तत्कालिन अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांनी केली

सत्यपालसिंगाचा मुक्काम अन् व्यवस्थापकांचा बळी
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे भाजपा खासदार सत्यपालसिंग यांच्या महाराष्ट्र सदनातील शाही मुक्कामाची सोय तत्कालिन अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांनी केली असून, आपल्याला या प्रकरणी कारणो दाखवा नोटीस आणि रात्रीतून मुंबईत बदली करण्याचे कारस्थान गायकवाड यांच्या मर्जीमुळे निवासी आयुक्त बिपीन मलीक यांनी केल्याची सनसनाटी तक्रार सदनाचे व्यवस्थापक सुहास ममदापूरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
या प्रकरणाचीही चौकशी आता मुख्य सचिव करणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. शुक्रवारी मुख्यसचिव ज.स.सहारिया चौकशीसाठी येणार होते. पण सायंकाळी ते येणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर आयआरसीटीसीने नेमलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीने दुपारी सदनात येऊन चौकशी केल्याचे सांगण्यात आले. ही चौकशी अत्यंत गुप्त पध्दतीने करकण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांना त्याबाबत समितीने बोलावलेही होते पण त्यांनी लेखी देऊ असे सांगितले. तथापि, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी असे कोणतेही बोलावणो आले नसल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे ममदापूरकर यांनी पाठविले पत्र अत्यंत स्फोटक आहे. मलिक यांनी त्यांचा केलेला पाणउतारा या पत्रचे कारण असल्याचे सांगण्यात आले. तर गायकवाड प्रतिनियुक्ती संपल्याने मुंबईत अवर सचिव म्हणून बदली झालेले गायकवाड यांना पुन्हा सदनात आणण्याचा खटाटोप स्वत: मलिक करत असल्याने आपल्या कोणतेही कारण नसताना कारणो दाखवा नोटीस बजावली व रात्री नऊ वाजता बदली झाल्याचे सांगण्यात आले. ममदापूरकर यांच्या पत्रत म्हटले आहे, की 26 मे रोजी सदनाचे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो. मात्र सदनातील कक्ष वितरणाचे संपूर्ण अधिकार तेव्हाचे अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांना होते.
खा.सत्यपालसिंग यांना सदनात कक्ष द्यावा असे पत्र लोकसभा सचिवालयाने सदनाला तीन जून रोजी दिले. मात्र त्यापूर्वीच म्हणजे, 31 मे रोजी दुपारी एक वाजता सत्यपालसिंग यांना कक्ष बहाल करण्यात आला होता. मात्र कारणो दाखवा नोटीस देऊन आपली तात्काळ प्रभावाने मूळ पदावर मुंबई येथे बदली करण्यात आली. ममदापूरकर हे मंत्रलयात कक्ष अधिकारी असून, ते सदनात येण्यापूर्वी पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांचे स्वीयसचिव होते. प्रतिनियुक्तीवरील बदली करताना तीन महिन्याची नोटीस द्यावीलागते, मात्र असे न करता मनमानी पध्दतीने बदली करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत निवासीआयुक्त बिपीन मलिक यांच्याशी संपर्क केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तर ममदापूरकर म्हणाले.
च्मुख्यसचिवासह, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांनाही त्यांनी सत्यपालसिंग प्रकरणी आपला कसा बळी देण्यात आला, याची वस्तुस्थिती सदनातील याबाबतच्या सर्व कागदपत्रंचा हवाला देऊन सांगितली आहे.