शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

माजी सैनिकाने वाचवला बुडणाऱ्या पाच तरुणांचा जीव; अंबानींच्या अँटिलियाशी आहे संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:35 IST

पंजाबमध्ये एका माजी सैनिकाने कालव्यात बुडणाऱ्या पाच तरुणांना वाचवलं आहे.

Punjab Accident: लष्करातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाने आपलं शौर्य आणि जिद्द पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.  हरजिंदर सिंग या ४९ वर्षीय माजी सैनिकाने आपल्या दोन किशोरवयीन मुलांसह पाच जणांना पंजाबमध्ये एका कालव्यातून बुडताना वाचवलं. एसयूव्ही गाडी कालव्यात पडल्यानंतर पाचही जण जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी  हरजिंदर सिंग यांनी सर्वांना बाहेर काढलं. मात्र, एका व्यक्तीला वाचवता आले नाही. बर्फासारख्या थंड पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लुधियाना येथे रात्रीच्या सुमारास पावत आणि बिहलोपूर गावांदरम्यान असलेल्या सिरहिंद कालव्यात ही घटना घडली. माजी लष्करी जवान हरजिंदर सिंग हे सध्या मुकेश अंबानींच्या अँटिलियाच्या सुरक्षा दलात तैनात आहेत. सध्या ते सुट्टीसाठी आपल्या घरी पटियाला येथे आले आहेत. सोमवारी ते १८ वर्षीय गुरलीनप्रीत सिंग आणि १७ वर्षीय हरकिरत सिंग या दोन मुलांसोबत गाडीने एका लग्नावरुन परतत होते. त्यावेळी त्यांना कालव्यात एक गाडी बुडत असल्याची दिसली. हा सगळा प्रकार पाहून त्यांनी गाडी थांबवली तेव्हा एसयूव्हीमधील सहा जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

यानंतर हरजिंदर सिंग आपल्या दोन मुलांसह त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उतरले. तिघांनी मिळून गाडीच्या काचा फोडून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. झाडांच्या तुटलेल्या फांद्या घेऊन तिघांनीही सर्वांना चिखलातून बाहेर काढलं. पिता-पुत्रांनी सर्वांना बाहेर काढून रस्त्यावर आणलं. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र यातील एकाचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर स्थानिकांनी हरजिंदर सिंग यांचे कौतुक केले आहे. २००८ मध्ये हरजिंदर यांनी एका २५ वर्षांच्या मुलीलाही वाचवलं होतं.  हरजिंदर सिंग यांनी मुलीला गढूळ पाण्यातून ओढत किनाऱ्यावर आणलं होतं. त्यानंतर बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल राज्य सरकारने त्यांचा गौरव केला होता. हरजिंदर हे कारगिलमध्ये जखमी झाले होते. युद्धानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बाहेर नेण्यात आले.

टॅग्स :PunjabपंजाबIndian Armyभारतीय जवान