ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

By Admin | Updated: July 10, 2017 00:23 IST2017-07-10T00:23:16+5:302017-07-10T00:23:16+5:30

‘नायक’ चित्रपटात सहायक भूमिका केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल (७१) यांचे रविवारी येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले

Veteran actress Sumita Sanyal passes away | ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

कोलकाता : गाजलेल्या ‘आनंद’ आणि सत्यजित राय यांच्या ‘नायक’ चित्रपटात सहायक भूमिका केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल (७१) यांचे रविवारी येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या हृदयाचे काम थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना वाढत्या वयाच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सुमिता सन्याल यांच्या मागे एकमेव मुलगा आहे.
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंद’ (१९७०) व ‘गुड्डी’ (१९७१) व गुलझार यांच्या ‘मेरे अपने’ (१९७१) मध्ये सन्याल यांची भूमिका होती. बंगाली प्रेक्षकांना सन्याल यांची ‘कुहेली’ (१९७१), सगिना महातो (१९७०) व ‘नायक’ (१९६६) मधील भूमिकांसाठी त्यांची आठवण येईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुमिता सन्याल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

Web Title: Veteran actress Sumita Sanyal passes away