शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सोडचिठ्ठी देत शत्रुघ्न सिन्हा झाले काँग्रेसवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 12:53 IST

गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक प्रसंगी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते फार काळ भाजपामध्ये राहणार नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंडखोरीमुळे पाटलीपुत्र या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी नाकारून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यांचा काँग्रेसप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेरीस आज काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, ''भाजप हुकुमशाही पध्दतीने काम करु लागला आहे, वन मॅन शो झालाय. वन मॅन शो अ‍ॅन्ड इन टू मॅन आर्मी. हे दोघेजण मिळून पक्ष आणि सरकार चालवताहेत, अशी टीका खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली होती,'' 

''नानाजी देशमुख यांनी मला घडवलं. त्यांनी मला अटलजी, अडवाणीजींच्या ताब्यात दिले. मला इतके प्रेम मिळाले, की मी त्यांच्यासोबत राहू लागलो. परंतु आमचा पक्ष अटलजी, आडवाणीजी यांच्यावेळच्या लोकशाहीतून हुकूमशाहीत बदलत गेला. सुरुवातीच्या काळात जसे सामूहिक निर्णय घेतले जात होते, ते आता संपुष्टात आले. अधिकारशाही (आॅथेरेटियन रुल) सुरु झाली. संवाद बिलकुल संपला. आपण आडवाणीजी, डॉ. मुरली मनोहर जोशीजी, विद्वान यशवंत सिन्हाजी व अरुण शौरींबाबत काय झाले, ते आपण पाहताच आहात. हे लोक आडवाणीजींचे समर्थक आहेत, असे त्यांना वाटले असावे. किंवा मी सत्य आणि सिध्दांतांंवर अधिक जोर देतो आहे, असेही त्यांना वाटले असेल. परंतु मांजरीला खोलीत बंदिस्त केलं आणि तिला रस्ता मिळाला नाही तर ती पंजा तर मारेलच ना. इतके होऊनही मी म्हणालो होतो, की मी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला काढून टाकावे. परंतु ते मला काढूच शकले नाहीत.'' असे ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019