वेर्णा स्पोर्टस क्लब उपांत्य फेरीत
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
मडगाव: वेर्णा स्पोर्टस क्लब संघाने मार्ना शिवोलीच्या सेंट ॲथनी क्लब संघाचा १-0 गोलानी पराभव केला. या बरोबर त्यानी ४४ व्या कॉस्तादियो स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्याचे पहिले सत्र गोलविना राहिले होते तर दुसर्य सत्रात ५८ व्या मिनिटाला वेर्णा स्पोर्र्टस क्लबच्या विल्सन फर्नाडीसने संेट ॲंथनी क्लबचा गोलरक्षक साईल च्यारील चकवून गोलाची नोंद केली. त्यानंतर सेंट ॲंथनी क्लबच्या खेळाडूनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला होता. ही स्पर्धा राय येथील पंचायत मैदानावर खेळविण्यात आली होती. (प्रतिनिधी)