वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहा

By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:26+5:302015-09-10T16:46:26+5:30

त साजरा

Veer Gogadev Janmotsav enthusiasm | वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहा

वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहा

साजरा
बारामती दि. १० (प्रतिनीधी):
बारामती शहरात वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्युत रोषणाईने सजविलेली निशाणे (छडी) यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
ढोल ताशांचा गजर ,बँड पथकाचे सुर ,फटाक्यांची आताषबाजीत वीर गोगादेव यांच्या जयघोषात बारामती शहरातुन वीर गोगादेव यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. तसेच , विद्युत रोषणाईने सजविलेल्या सहा घोड्यांच्या रथामध्ये लक्षवेधी रोषणाईने व फुलांनी सजविलेल्या सहा घोड्यांच्या रथामध्ये विद्युत रोषणाई, फुलांनी सजविलेल्या गोरक्षनाथांची मुर्ती नागरींकांचे विशेष आकर्षण ठरले . मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन केले होते. उघडा मारुती मंदिरासमोर नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले, नगरसेवक संजय लालबिगे, संतोष गालिंदे, सुरज सातव, उत्तम धोत्रे यांनी वीर गोगादेव आखाड्याचे मनोज भगत आदींनी पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली. यावेळी मार्गावर मयूर लालबिगे मित्रमंडळ, अभिजित काळे, अमर धुमाळ मित्रमंडळ यांच्या वतीने भाविकांसह निशाणाचे स्वागत करण्यात आले.
————————————————————
फोटो ओळी : वीर गोगादेव निशाणा आखाड्याचे पूजन करताना नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले, नगरसेवक संजय लालबिगे, संतोष गालिंदे.
१००९२०१५-बारामती-०८
—————————————————
शिल्लक बातमी
—————————————————————

Web Title: Veer Gogadev Janmotsav enthusiasm