वैदिक बरळले, म्हणे काश्मीरला स्वतंत्र करावे

By Admin | Updated: July 15, 2014 11:12 IST2014-07-15T10:24:53+5:302014-07-15T11:12:50+5:30

भारताने मनाचा मोठेपणा दाखवत काश्मीरला स्वतंत्र केले पाहिजे असे वादग्रस्त विधान पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी केले आहे.

Vedic got rid of, saying Kashmir should be independent | वैदिक बरळले, म्हणे काश्मीरला स्वतंत्र करावे

वैदिक बरळले, म्हणे काश्मीरला स्वतंत्र करावे

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेणारे भारतीय पत्रकार वेद प्रकाश वैदिक यांचा पाकिस्तान दौ-यावरुन सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये वैदिक यांनी भारताने मनाचा मोठेपणा दाखवत काश्मीरला स्वतंत्र करायला पाहिजे असे मत मांडले आहे. वैदिक यांच्या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 
योगगुरु बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे कट्टर समर्थक वेद प्रकाश वैदिक हे नुकतेच पाकिस्तान दौ-यावर गेले होते. या दौ-यात वैदिक यांनी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेतली. या भेटीमुळे वैदिक यांच्यावर जोरदार सुरु असतानाच पाक दौ-यादरम्यान वैदिक यांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखात समोर आली आहे. या मुलाखातीमध्ये वैदिक यांनी काश्मीर मुद्द्यावर भारताने मनाचा मोठेपणा दाखवायला हवा असे म्हटले आहे. भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आणि दोन्ही देश काश्मीरला स्वतंत्र करायला असतील तर यात गैर काहीच नाही. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमध्ये 'दरार' निर्माण करत असून ही दरार आता फुलांमध्ये करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vedic got rid of, saying Kashmir should be independent