शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:09 IST

कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास पगार कापला जाण्याची शक्यता

जयपूर : शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश राजस्थान सरकारकडून शिक्षकांना देण्यात आले आहेत. 13 डिसेंबर 2013 पासून सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना हा आदेश लागू असणार आहे. पाच सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी होणाऱ्या सरकारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचा पगार कापला जाईल, असंदेखील राज्य सरकारनं आदेशात म्हटलं होतं. मात्र त्यानंतर एक दिवसाचा पगार कापण्याचा आदेश मागे घेण्यात आला.13 डिसेंबर 2013 रोजी वसुंधरा राजे सिंधिया यांनी राजस्थानाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जयपूरमध्ये होणाऱ्या सरकारी कामाला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. '13 डिसेंबर 2013 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना सरकारकडून आयोजित करणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणं अनिवार्य असेल,' असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. या आदेशावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं टीका केली आहे. वसुंधरा राजे सरकारकडून शिक्षकांमध्ये भेदभाव का केला जात आहे?, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. 13 डिसेंबर 2013 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाआधी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांची बैठक घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक दिनी होणाऱ्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास एका दिवसाचा पगार कापला जाईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आदेशातील हे वाक्य वगळण्यात आलं.  

टॅग्स :Teacherशिक्षकRajasthanराजस्थान