शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! स्वत: दृष्टिहीन पण विद्यार्थ्यांच्या जीवनात 'प्रकाश' टाकणारा 'वसंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:44 IST

सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या वसंत कुमार यांनी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले.

जीवनात काही नवीन करण्याची जिद्द असेल तर कोणीच तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही, असे नेहमी बोललं जातं. किंबहुना वडिलधारी मंडळी मुला-बाळांसमोर असे धडे गिरवत असतात. जिद्द, चिकाटी आणि मेहनत माणसाला काय बनवू शकते याचा प्रत्यय एका दृष्टीहीन प्राध्यापकाकडे पाहून येतो... राजस्थानमधील भीलवाडा येथील एका अंध शिक्षकाचे कार्य अनेकांसाठी प्रेरणा आहे. भीलवाडा येथील सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या वसंत कुमार यांनी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. एवढेच नाही तर ते स्वत: पाहू शकत नसले तरी विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम ते करत आहेत. खरं तर वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. 

दरम्यान, दृष्टीहीन झाल्यानंतर जवळपास १८ वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्यांनी सरकारी शाळेत शिक्षण होण्याचा मान पटकावला. आता ते मेहनतीच्या जोरावर या शाळेचे प्राध्यापक देखील झाले आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर, संघर्षमय होता, जो आज अनेकांसाठी प्रेरणा आहे. भीलवाडा शहरातील माध्यमिक विद्यालय गांधीनगरचे प्राध्यापक वसंत कुमार यांनी सांगितले की, त्यांची दृष्टी गेली असल्याचे त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी समजले. 

दृष्टीहीन असल्याने वाटेत समस्यांचा डोंगर वसंत कुमार सांगतात की, दृष्टी गेल्याचे कळताच वडिलांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार माझ्यासारख्यांसाठी असलेल्या शाळेत मला पाठवण्यात आले. माझे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी मला शिक्षणापासून कधी वंचित ठेवले नाही. त्यामुळे भीलवाडा शहराबाहेरील शाळेत मला ठेवण्यात आले. १८ वर्ष कुटुंबीयांपासून लांब राहून वेगवेगळ्या भागांत शिक्षण घेतले. आजच्या घडीला संस्कृत विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, अनेक ठेचा खाल्ल्या. दृष्टीहीन असताना देखील स्वप्नांकडे धाव घेत इथपर्यंत मजल मारली. 

कधीच हार मानली नाही...दरम्यान, आपल्या जीवनातील संघर्ष सांगत वसंत मुलांना धडे देतात. यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात. 'मी एक अंध व्यक्ती असताना देखील मेहनती केली अन् शिक्षक बनलो', हे माझं वाक्य विद्यार्थ्यांना सांगत सांगत मी त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम करतो. तसेच 'अगर किसी भी चीज को सच्चे दिल से चाहो और मेहनत करो तो सफलता हासिल हो ही जाती है', अशा शब्दांत वसंत कुमार यांनी त्यांच्या यशाचे रहस्य थोडक्यात सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीTeacherशिक्षक