वासाळी ग्रामपंचायत सदस्याचे सामूहिक राजीनामे
By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30
मनमानी : सरपंचाच्या कारभाराला कंटाळून उचलले पाऊल; प्रशासक नेमण्याची मागणी

वासाळी ग्रामपंचायत सदस्याचे सामूहिक राजीनामे
म नमानी : सरपंचाच्या कारभाराला कंटाळून उचलले पाऊल; प्रशासक नेमण्याची मागणी घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील सरपंच उपसरपंचासह सदस्याना विश्वासात न घेता मनमानी कारभार करु न एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत चार ग्रामपंचायत सदस्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहे. हे सर्व राजीनामे मंजूर करण्यात आले असून या सदस्यानी ग्रामपंचायत बरखास्त करु न प्रशासक नेमावा, अशी मागणी केली आहे. वासाळी च्या सरपंच या इतर उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप गेल्या काही महिन्यांपासून होत असून सत्ताधारी सदस्यांमध्ये धुसपुस होती. शासनाच्या विविध योजनाअंतर्गत गावात होत असणारी कामे पारदर्शी होत नसल्याचा आरोप या सदस्यांकडून होत होता. या कामांच्या निधिची आणि गुणवत्तेची लेखी मागणी करूनही माहिती मिळत नसल्याने हे ग्रामपंचायत सदस्य हतबल झाले होते. अखेर नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे ठरविले.त्यानुसार ग्रामपंचायतची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.सरपंच अलका झोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपसरपंच सुनीता किसन धनगर, ग्रामपंचायत सदस्य नवसू किसन कोरडे, कुंडलिक परसराम मुंढे,मीराबाई अशोक खादे,व म्हाळसाबाई एकनाथ साबळे या सदस्यांनी आपले सामूहिक राजीनामे सरपंचाकडे सादर केले. हे सर्व राजीनामे या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.दरम्यान नऊ सदस्यांपैकी पाच सदस्यानी राजीनामे दिल्याने सदस्यसंख्या निम्याहून कमी झाली आहे.त्यामुळे ही ग्रामपंचायत बरखास्त करु न या ठिकाणी प्रशासक नेमावा,अशी मागणी या राजीनामा दिलेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)