श्री महावीर सौभाग्य उमेश संस्थानमध्ये विविध कार्यक्रम
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
नाशिक : पंचवटीतील केवडीबन येथील श्री महावीर सौभाग्य उमेश संस्थानमध्ये २५ जुलैपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. आचार्य आनंदऋषीजी म.सा. शिक्षापात्र तत्त्वचित्तीका साध्वी अमित ज्योती म.सा., साध्वी सुदर्शनाजी म.सा., संगीत साधिका आंतज्योतीजी म.सा. यांच्या उपस्थितीत दररोज सकाळी प्रवचन होत आहे.

श्री महावीर सौभाग्य उमेश संस्थानमध्ये विविध कार्यक्रम
न शिक : पंचवटीतील केवडीबन येथील श्री महावीर सौभाग्य उमेश संस्थानमध्ये २५ जुलैपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. आचार्य आनंदऋषीजी म.सा. शिक्षापात्र तत्त्वचित्तीका साध्वी अमित ज्योती म.सा., साध्वी सुदर्शनाजी म.सा., संगीत साधिका आंतज्योतीजी म.सा. यांच्या उपस्थितीत दररोज सकाळी प्रवचन होत आहे. संस्थानमध्ये आचार्य आनंदऋषीची म.सा. यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच रक्षाबंधनानिमत्त कौन जितेगा भाई-बहन का ताज आणि भाविकांच्या उपस्थित मरुधरे केसरी आणि रुपचंद म.सा. यांचा जन्मोत्सवही साजरा करण्यात आल्याचे साध्वी अमित ज्योती म.सा. यांनी सांगितले. सुदर्शनाजी म.सा. यांच्या ३४ उपवासाच्या परिपूर्णतेवर मंगळवारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली, चंदीगढ, पुणे येथील पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते. प्रणवऋषीजी म.सा. यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. तसेच ६ सप्टेंबरला जन्माष्टमीनिमित्त अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १८ सप्टेबर दरम्यान जैनाचे परीक्षण पर्व साजरा करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबरला साध्वी अमितज्योती म.सा. यांचा जन्मदिवस व आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पारख सुराणा, चतुर्मास समिती अध्यक्ष मोहनलाल लोढा, सुरेंद्र टांटिया, दिलीप टांटिया, विजय ओस्तवाल आदि परिश्रम घेत आहेत.इन्फो : ३४ दिवस पाण्यावर उपवास साध्वी सुदर्शनाजी म.सा. यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३४ दिवस अन्नाचे सेवन न करता फक्त पाणी घेऊन उपवास केला आहे. त्यांचा उपवास उद्या (दि.२) सुटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपवास पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने मंगळवारी जैन परिषद आयोजित करण्यात आली होती.