आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
श्रीरामपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी श्रीरामपूर शहर व तालुक्यात विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
श रीरामपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी श्रीरामपूर शहर व तालुक्यात विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्याचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार अमर साबळे श्रीरामपूरमध्ये जयंतीसाठी येत आहेत. डॉ. आंबेडकर जयंती महिला एकता समितीच्या वतीने १५ एप्रिलला सायंकाळी सात वाजता भीमगीत संगीत रजनी व पुरस्कार प्रदान सोहळा ठेवण्यात आला आहे, असे समितीच्या अध्यक्षा रमा धीवर यांनी सांगितले. पंचशिल सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने सकाळी १० वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता विविध स्पर्धांचा पारितोषिक समारंभ होऊन प्रतिमेची मिरवणूक निघेल. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी १० वाजता रेल्वे स्थानकासमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले जाईल. त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहारात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.टिळकनगर येथील पुतळ्यापासून दत्तनगरच्या पुलापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, दत्तनगरच्या तक्षशिला बुद्धविहारातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून जयंतीच्या मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. यासाठी पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)