Varanasi Crime : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका तरुणाच्या मृत्यूची हादरवणारी घटना समोर आली आहे. तरुणाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याने वाराणसीत खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेमुळे तरुणाने आपला जीव गमवला आहे. माँ काली अवतार घेतल्याचा दावा या तरुणाने केला होता. त्यामुळे तरुण रात्रभर काली देवीची पूजा करत राहिला. यानंतर दुपारी त्याने स्वतःचा गळा चिरला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाराणसीतील गायघाट परिसरात ही घटना घडली आहे. माँ कालीचे दर्शन न मिळाल्याच्या दु:खाने एका पुजाऱ्याने गळा चिरून आत्महत्या केली. काली देवीच्या पूजेदरम्यान पुजाऱ्याने धारदार सुऱ्याने गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
अमित शर्मा नावाचा तरुण रात्रभर काली देवीची पूजा करत होता. पुजारी गेल्या २४ तासांपासून माँ कालीची साधना अमितकडून सुरु होती. २४ तास उलटूनही माँ कालीचे दर्शन ना झाल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली. अमितने गळा चिरल्यानंतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथून त्याला बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. जखमी अरुणाचा तेथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अमित शर्मा हा धार्मिक विधी करून आपला उदरनिर्वाह करत होता.
अमित शर्मा पत्नी जुली आणि १० वर्षांच्या मुलासह गायघाट येथे सात वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होता. श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि परिसरातील इतर मंदिरांमध्ये तो नेहमीच जात आहे. सोमवारी रात्री त्याने पत्नीला सांगितले की, तो मंगळवारी माँ काली प्रकट करणार आहे. त्यासाठी त्याने रात्री बारा वाजता अंगणात दीप प्रज्वलित करून भगवान शंकर, काली माँ व इतर देवी-देवतांचे फोटो लावून पूजेला सुरुवात केली.
त्यानंतर मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास त्याने मोठ्याने देवी-देवतांचा नामजप सुरू केला आणि धारदार चाकूने स्वतःचा गळा चिरला. त्याचा आवाज ऐकून पत्नीने स्वयंपाकघरातून धाव आली तेव्हा तिला अमितला रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. तो जोर जोरात ओरडू लागला. हे ऐकून शेजारचे लोकही आले आले आणि त्यांनी अमितला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.