वाराणसीत निवडणूक आयोगाचा भाजपा कार्यालयावर छापा

By Admin | Updated: May 11, 2014 17:56 IST2014-05-11T17:42:32+5:302014-05-11T17:56:31+5:30

वाराणसीतील मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पोलिसांच्या उपस्थिती रविवारी भाजपाच्या कार्यालयावर छापा टाकला.

In Varanasi, the Election Commission has printed the BJP office | वाराणसीत निवडणूक आयोगाचा भाजपा कार्यालयावर छापा

वाराणसीत निवडणूक आयोगाचा भाजपा कार्यालयावर छापा

>ऑनलाइन टीन
वाराणशी, दि. ११ - सर्व देशाचे लक्ष लागलेल्या वाराणसीतील मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पोलिसांच्या उपस्थिती रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यात बिल्ले, टी-शर्टस व प्रचाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. भाजपाने मात्र या प्रकाराबाबात तीव्र नाराजी वर्तवली आहे. 
वाराणसी शहरातील गुलाबाग परिसरातील भाजपाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. शहरातील प्रचार संपल्यावरही हे साहित्य वाटण्याचा भाजपाचा प्रयत्न होता, असे आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले. भाजापच्या कार्यकर्त्यांनी मात्र याचा साफ इन्कार करत प्रचार संपल्यानंतर उरलेले साहित्य कार्यालयात ठेवण्यात आले होते, असे स्पष्टीकरण दिले. 
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय असे दिग्गज वाराणसीतून निवडणूक लढवत असल्याचने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. 

Web Title: In Varanasi, the Election Commission has printed the BJP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.