पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हाणामारी
By Admin | Updated: May 12, 2014 12:56 IST2014-05-12T10:53:01+5:302014-05-12T12:56:18+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालच्या हारुआ बशीरहाटभागात हाणामारी होऊन १३ जण जखमी झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हाणामारी
>ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. १२ - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालच्या हारुआ बशीरहाटभागात हाणामारी होऊन १३ जण जखमी झाले आहेत. हारूआ येथील ब्राहमान्चक भागातील दोन मतदान केंद्रांवर तृणमूल काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात ही घटना घडली.
दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे वृत्त आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.