शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

वारी आनंदाचे भांडार

By admin | Updated: July 15, 2015 00:14 IST

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.
या वारीकडे मी आध्यात्मिक विज्ञानाच्या भिंगातून पाहतो. जे इंजिनिअरिंगच्या भौतिक शास्त्रातले सिद्धांत आहेत तेच सिद्धांत संस्कृतमध्ये आहेत. त्याची सांगड असल्याचे कळाल्यापासून वारीला जायची अपार इच्छा होती; पण जमत नसे. आता रिटायर झाल्यावर जमेल तेवढ्या वार्‍या करण्याचा निश्चय केला असल्याचे फडणीस सांगतात. फडणीस यांनी ३५० अभंग आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेचे ते काम करतात. वारीमध्ये महिला जास्त ॲडजेस्टमेंट करतात, असे आढळून येते. सरकारने पालखी मार्गावर महिलांसाठी शौचालये उपलब्ध करून द्यावीत, असे वाटते.
वारकर्‍यांनी निर्माण केला स्वच्छतेचा आदर्श
माऊली जेजुरीत : बेलभंडारा उधळत माऊलींचे स्वागत
बाळासाहेब बोचरे - जेजुरी : राज्यातील अस्वच्छतेबद्दल वारकर्‍यांच्या माथी खापर फोडले जात असताना आज सासवडच्या तळावर वारकर्‍यांनी स्वच्छतेचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीत दाखल झाली असून, उद्या वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.
वारकरी स्वच्छता पाळत नाहीत, बेशिस्त वागतात असा वारकर्‍यांबद्दलचा अपप्रचार केला जात होता. ते काही अंशी खरे असले तरी वारकर्‍यांना पर्याय उपलब्ध नसल्याने पालखी मार्गावर अस्वच्छता दिसत होती. यावर उपाय म्हणून आळंदीच्या चोपदार फाउंडेशन व पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने वारकर्‍यांना ५० हजार पिशव्यांचे वाटप केले. आपला कचरा, शिळे अन्न कुठेही न टाकता पिशवीत भरून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वारकर्‍यांनी कचरा पिशवीत भरून ठेवल्याने पालखी तळावर स्वच्छता दिसून आली. नगरपालिकेचे कर्मचारी सर्व पिशव्या एकत्र करून कचरा डेपोत टाकल्या. त्यामुळे पालखी तळ व परिसरात कुठेही घाण दिसून आली नाही.
अद्याप फक्त नोंदणीकृत दिंड्यांना पिशव्या वाटप करण्यात आल्याने आणि इतर दिंड्यांना पिशव्या नसल्याने काही ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला होता. तथापि अशारितीने अस्वच्छता नियंत्रणात आणू शकतो, हा वेगळा आदर्श आज वारकर्‍यांनी निर्माण केला आहे.
जेजुरीत माऊलींचे भंडारा उधळून स्वागत
सायंकाळी मल्हारगडी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत भंडार्‍याची उधळण करून करण्यात आले. रणरणत्या उन्हात वाटचाल करून आलेले वारकरी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी गर्दी करत होते. त्यामुळे आज सोहळा भंडार्‍यात न्हाऊन निघाला होता.