Vande Mataram: जे गीत ऐकून भारतीयांच्या मनात देशभक्तीची उत्स्फुर्त भावना निर्माण होते, त्या ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले आहे. अनेक राज्यांतील शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला काही मुस्लिम संघटना तीव्र विरोध करत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये वाद पेटला
जम्मू-काश्मीरमध्ये मुत्ताहिदा मजलिस-ए-उलेमा (MMU) या संघटनेने या आयोजनाला “गैर-इस्लामी” म्हणत तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य प्रशासनाने अलीकडेच आदेश जारी केला की, उद्या(7 नोव्हेंबर) राज्यातील सर्व शाळांनी ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करावेत. हा आदेश सर्व शाळांसाठी अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, MMU चा या आदेशाला तीव्र विरोध आहे.
मीरवाइज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालील MMU ने सांगितले की, ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा पठण इस्लामच्या शिकवणीनुसार गैर-इस्लामी आहे, त्यामुळे अशा आदेशांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. MMU ने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. संघटनेने इशारा दिला आहे की, जर आदेश मागे घेतला नाही, तर राज्यातील सर्व धार्मिक नेते एकत्र येऊन पुढील धोरण ठरवतील.
MMU चे आरोप
MMU चा आरोप आहे की, प्रशासन मुस्लिम बहुल भागात हिंदू प्रेरित विचारधारा लादण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धांविरुद्ध असलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने सहभागी करणे अयोग्य असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारचा निर्णय
दरम्यान, केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षानिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने या उपक्रमाला “राष्ट्र एकता उत्सव” असे नाव दिले आहे. या अंतर्गत सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल जनजागृती केली जाईल.
Web Summary : As 'Vande Mataram' marks 150 years, nationwide celebrations are planned. However, a Muslim organization in Jammu & Kashmir opposes mandatory events, deeming the song un-Islamic. They urge withdrawal of orders enforcing participation in schools.
Web Summary : 'वंदे मातरम' के 150 वर्ष पूरे होने पर देश भर में उत्सव की योजना है। जम्मू-कश्मीर में एक मुस्लिम संगठन अनिवार्य कार्यक्रमों का विरोध कर रहा है, गीत को गैर-इस्लामी बता रहा है और स्कूलों में भागीदारी लागू करने वाले आदेशों को वापस लेने का आग्रह कर रहा है।