सफाई कामगारांना जात वैधता प्रमाणपत्र

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:37+5:302015-02-11T00:33:37+5:30

नागपूर: जात वैधता प्रमाणपत्रासाठी सफाई कामगारांच्या मुलांची एकूण ११३३ प्रकरणे समितीकडे आली होती. त्यापैकी १०२९ अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून १०४ अर्ज त्रुटींमुळे प्रलंंबित आहेत, अशी माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

Validation Certificate for cleaning workers | सफाई कामगारांना जात वैधता प्रमाणपत्र

सफाई कामगारांना जात वैधता प्रमाणपत्र

गपूर: जात वैधता प्रमाणपत्रासाठी सफाई कामगारांच्या मुलांची एकूण ११३३ प्रकरणे समितीकडे आली होती. त्यापैकी १०२९ अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून १०४ अर्ज त्रुटींमुळे प्रलंंबित आहेत, अशी माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या बैठकीत देण्यात आली.
राष्ट्रीय सफाई आयोगाच्या सदस्य डॉ. लता महतो यांच्या उपस्थितीत समितीची एक बैठक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (क्र.३)च्या कार्यालयात मंगळवारी पार पडली. बैठकीला समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपायुक्त डी.ए. रक्षेकर, माधव झोड, संशोधक अधिकारी राजेश पांडे, जी.डी. वाकोडे आणि समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आर.डी. आत्राम व शिक्षण उपसंचालक प्रकाश कोल्हे उपस्थित होते. शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सफाई कामगारांच्या मुलांना मदत करण्याची सूचना यावेळी डॉ. लता महतो यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Validation Certificate for cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.