व्हॅलेन्टाईन - २
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:01+5:302015-02-14T23:51:01+5:30
पोलिसांचा तगडा बंदोबस्त

व्हॅलेन्टाईन - २
प लिसांचा तगडा बंदोबस्तशिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी आज सकाळपासूनच तगडा बंदोबस्त लावला. अंबाझरी, फुटाळा, सक्करदरा, बॉटनिकल गार्डन, तेलंगखेडी, सेमिनरी हिल्ससह विविध उद्यानांच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची वाहने आणि मोठा पोलीस ताफा उभा होता. उद्यानाच्या आतमध्ये साध्या वेशातील पुरुष आणि महिला पोलीस विरोध करणाऱ्यांसोबतच प्रेमीयुगुलांवरही नजर ठेवून होते. त्यामुळे कसलाही गैरप्रकार घडल्याची तक्रार नाही. ----(कोट : सहपोलीस आयुक्त)कायदेशीर मार्गाने आपला विरोध प्रगट करता येऊ शकतो. मात्र, विरोधाच्या नावाखाली कुणी कायदा हातात घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. चौकशीत ज्या दोषींची नावे पुढे येतील, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. अनुपकुमार सिंहसहपोलीस आयुक्त, नागपूर----