विष्णू वाघ यांना ‘पायगुडे’ पुरस्कार
By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:11+5:302015-08-14T00:05:11+5:30
पणजी : मुंबई येथील दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या अग्रगण्य संस्थेतर्फे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा ‘दिलीप पायगुडे’ साहित्य पुरस्कार साहित्यिक आमदार विष्णू सूर्या वाघ यांना जाहीर झाला आहे. 1994 वर्षांपासून हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात भरीव व अमूल्य असे योगदान दिलेल्या साहित्यकाला देण्यात येतो. पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. 22 ऑगस्ट रोजी मुंबई येथील ना. म. जोशी सभागृहात सायं. 6 वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रुपये दहा हजार व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विष्णू वाघ यांना ‘पायगुडे’ पुरस्कार
प जी : मुंबई येथील दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या अग्रगण्य संस्थेतर्फे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा ‘दिलीप पायगुडे’ साहित्य पुरस्कार साहित्यिक आमदार विष्णू सूर्या वाघ यांना जाहीर झाला आहे. 1994 वर्षांपासून हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात भरीव व अमूल्य असे योगदान दिलेल्या साहित्यकाला देण्यात येतो. पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. 22 ऑगस्ट रोजी मुंबई येथील ना. म. जोशी सभागृहात सायं. 6 वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रुपये दहा हजार व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.