लसीकरणात पाचमागे दोन बालके वंचित

By Admin | Updated: June 22, 2014 01:29 IST2014-06-22T01:29:12+5:302014-06-22T01:29:12+5:30

देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे.

In the vaccine, deprived of two children after five | लसीकरणात पाचमागे दोन बालके वंचित

लसीकरणात पाचमागे दोन बालके वंचित

>नवी दिल्ली : प्राणघातक आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे. युनिसेफच्या एका ताज्या अहवालानुसार, देशात सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवूनही सामान्य लसीकरणाचे प्रमाण 61 टक्के एवढेच आहे. याचा अर्थ, प्रत्येक पाच मुलांमधील दोन मुले ही मूलभूत लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत.
दरवर्षी पाच वर्षाखालील सुमारे 14 लाख मुले निमोनिया व जुलाबसारख्या आजारांना बळी पडतात. या मुलांचा मृत्यू लसीकरणाने रोखला जाऊ शकतो. मृत्युमुखी पडणा:या या मुलांमध्ये अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असते. 
मुस्लिम समाजातील मुलांना या लसी फार कमी दिल्या जातात, असेही या अहवालात नमूद केले आहे. मुस्लिम समाजातील मुलांच्या लसीकरणाची टक्केवारी केवळ 36.3 एवढी अल्प आहे.
भौगोलिक विविधता, अंधविश्वास, चुकीच्या समजुती आदी कारणो यामागे आहेत. देशात दरवर्षी सुमारे 2 कोटी 7क् लाख मुले जन्माला येतात. त्यांचे लसीकरण करणो हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आसाम, प. बंगाल, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बालकांच्या लसीकरणाबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. कारण या राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाणही सरासरीने जास्त आहे. 
 
4युनिसेफ जामिया मिलिया विद्यापीठ व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागरणाचे हे अभियान चालविण्याच्या प्रयत्नात आहे. 

Web Title: In the vaccine, deprived of two children after five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.