कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 01:50 PM2021-01-01T13:50:07+5:302021-01-01T13:52:33+5:30

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

vaccination committee meeting oxford covaxin emergency approval for vaccine in india | कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनावरील लशीच्या वापराला तात्काळ मंजुरी मिळण्याची शक्यताकोविशील्डच्या लशीला आज मान्यता मिळणार?उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'

नवी दिल्ली
कोरोनावरील लशीच्या बाबतीत होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत ऑफ्सफर्ड अॅस्ट्राझेनकाच्या कोविशील्ड लशीला देशात तात्काळ मंजुरी देण्याचा निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अधिक माहिती मागविण्यात आली होती. 

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. लस देण्याच्या मोहिमेचे संपूर्ण नियोजन तयार आहे. भारत जगातील सर्वात मोठी लस मोहीम राबवणारा देश ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

२ जानेवारी रोजी देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'
देशातील प्रत्येक राज्यात उद्या २ जानेवारीपासून 'ड्राय रन' करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात ३० कोटी जनतेला लस
देशात लशीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. भारतात  सध्या कोरोनावरील लशींची सध्याची परिस्थिती काय? याची माहिती जाणून घेऊयात...
>> ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाची कोविशील्ड लस तयार
>> भारत बायोटेक आणि आयसीएमआरची कोवॅक्सीन लस देखील तयार आहे. 
>> दोन्ही लशींच्या तात्काळ वापराला कोणत्याही क्षणी मंजुरी मिळू शकते. 
>> अमेरिकेच्या फायझर कंपनीचीही लस तयार 
>> फायझरची लस देखील भारतात उपलब्ध होणार
>> तज्ज्ञांच्या समितीने फायझरकडून लशीसंदर्भात आणखी काही माहिती मागवली आहे. 
>> माहिती मिळाल्यानंतर फायझरच्या लशीच्या वापरालाही भारतात मंजुरी मिळेल. 
>> झायडस कॅडीला देखील लशीची निर्मिती करत आहे. 
>> झायडसच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. 

दरम्यान, पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये कोविशील्डच्या लशीचे तब्बल ५ कोटी डोस मंजुरी मिळण्याआधीच तयार देखील झाले आहेत. यावरुन लस निर्मितीच्या वेगाची कल्पना येईल. कोरोनावरील लस निर्मितीचं भारत हे केंद्र ठरत असून देशात जगातील सर्वात मोठ्या लशीकरणाच्या मोहिमेची लवकरच घोषणा होऊ शकते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: vaccination committee meeting oxford covaxin emergency approval for vaccine in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.