बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:49+5:302015-02-14T23:51:49+5:30

डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची बहुतांश पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे.

Vacancies of Veterinary Officer in Baglan taluka vacant | बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त

बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त

ंगसौंदाणे : बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची बहुतांश पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे.
बागलाण तालुक्यात गत चार ते पाच वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची श्रेणी १ ते ९ व श्रेणी २ ते ७ पदे रिक्त आहेत. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने तालुक्यात पशुधन आरोग्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. बागलाणमध्ये कामधेनू दत्तक ग्रामयोजनेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्‘ात सर्वप्रथम या योजनेचा शुभारंभ बागलाण तालुक्यात करण्यात आला असला तरी पशुवैद्यकीय अधिकारीच नियुक्त नसल्याने या चांगल्या योजनेचे भवितव्य अंधारातच आहे. तालुक्यात डांगसौंदाणे, जोरण, अलियाबाद, केळझर, आराई, नामपूरसह सुमारे दहा गावांना श्रेणी-१चे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, तर श्रेणी २चे १४ दवाखाने तालुक्यात अन्यत्र कार्यरत आहेत. तसेच शेतीप्रधान तालुका अशी बागलाणची खास ओळख आहे. ९० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून, त्यास पूरक व्यवसाय म्हणून दुधाळ जनावरे तसेच इतर जनावरे पाळण्याचा केला जातो.
कामधेनू दत्तक ग्रामयोजनेमुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांना जनावरांसाठी होणारा औषधोपचारांचा खर्च वाचणार होता. मात्र जनावरांच्या उपचारार्थ पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने त्यांची तपासणी खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांकडून करून घ्यावी लागते व त्यांचा आर्थिक भुर्दंड शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे तर अनेक पशुवैद्यकीय रुग्णालयात शिपायांमार्फत उपचार होत असल्याने शेतकर्‍यांतर्फे सांगण्यात आले. सदर अधिकार्‍यांची रिक्तपदे लवकरात लवकर भरली जावीत, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळेच बागलाण तालुक्यात अजूनही ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाचे भवितव्य अंधारात सापडले आहे व त्यामुळेे की काय, तालुक्यातील शेतकरी वर्गाकडील पशुधनाची संख्या घटत चालली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Vacancies of Veterinary Officer in Baglan taluka vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.