शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

उत्तरकाशी: गंगनानीजवळ भीषण अपघात, बस दरीत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 19:50 IST

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

उत्तरकाशी: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते, त्यापैकी किमान 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी गुजरातचे रहिवासी आहेत. यात्रेकरुंनी भरलेली ही बस गंगोत्रीहून प्रवास करुन परतत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने प्रवाशांना बाहेर काढले. 

या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 27 जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. अपघाताबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'गंगोत्री उत्तरकाशीकडून येणाऱ्या प्रवासी बस क्रमांक UK07PA-8585 चा गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानीजवळ अपघात झाला. गाडीत सुमारे 35 जण होते. 27 जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'

मुख्यमंत्र्यांनी अपघातावर शोक व्यक्त केला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या बस अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सीएम धामी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत लिहिले की, 'गंगनानीमध्ये गंगोत्रीहून उत्तरकाशीला जाणाऱ्या बसच्या अपघातात काही लोकांच्या मृत्यूची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. प्रशासनाला त्वरीत मदत आणि बचाव कार्य करण्याचे तसेच जखमींवर उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. सर्व जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.'

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंडDeathमृत्यू