उत्तराखंडमधील भाजप सरकार आधीच अंकिता भंडारी हत्याकांडाच्या प्रकरणावरून विरोधकांच्या निशाण्यावर असताना, आता एका नव्या वादामुळे सरकारची अडचण वाढली आहे. कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गिरधारी लाल साहू असे म्हणताना ऐकू येत आहेत की, "जर लग्न होत नसेल, तर २०,०००- २५,००० रुपयांना बिहारमधून मुलगी विकत घ्या. माझ्यासोबत चला, मी मिळवून देतो" एका जबाबदार मंत्र्याच्या पतीने महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उत्तराखंडच्या राजकारणात मोठी ठिगणी पडली आहे.
या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने भाजपवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुजाता पाल यांनी हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, "महिला सक्षमीकरण मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्याच्या घरातूनच जर अशी भाषा येत असेल, तर हे सरकार महिलांचा सन्मान कसा करणार? ही भाजपची खरी मानसिकता आहे." शिवाय, बिहारमधील महिलांचा अपमान केल्याबद्दल आरजेडीने एक्सवर पोस्ट करत भाजप आणि आरएसएसवर टीका केली. "भाजप नेत्यांच्या मनात बिहारी महिलांबद्दल किती घृणास्पद विचार आहेत, हे यातून स्पष्ट होते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे," अशी मागणी आरजेडीने केली आहे.
साहू यांचे स्पष्टीकरण
वाढता वाद पाहून गिरधारी लाल साहू यांनी एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले. त्यांनी दावा केला की, "माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. मी केवळ एका मित्राच्या लग्नाबाबतची जुनी घटना सांगत होतो. माझी पत्नी रेखा आर्य यांची प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि ते जाणीवपूर्वक राजकारण करत आहे."
Web Summary : Uttarakhand minister's husband's video, claiming girls are available cheaply in Bihar, sparked outrage. Opposition parties demand clarification, calling the statement shameful and reflective of BJP's mindset. He claims his statement was distorted.
Web Summary : उत्तराखंड के मंत्री के पति का वीडियो वायरल, जिसमें बिहार में लड़कियाँ सस्ते में मिलने का दावा किया गया है, जिससे आक्रोश फैल गया। विपक्षी दलों ने स्पष्टीकरण की मांग की, बयान को शर्मनाक और भाजपा की मानसिकता को दर्शाने वाला बताया। उनका दावा है कि उनके बयान को तोड़-मरोड़ कर पेश किया गया।