शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपूर्वी भाजपनं कापलं होतं तीरथ सिंहांचं तिकीट, आता बसवलं थेट मुख्यमंत्री पदावर; अशी मिळाली खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:15 IST

तिकीट कापले गेल्यानंतरही तीरथ सिंह यांनी ना पक्ष सोडला ना बंडखोरी केली. उलट सतपाल महाराज यांना जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यामुळेच आता भाजपने त्यांना आधी लोकसभेचे तिकीट दिले आणि आता मुख्यमंत्री पदाचा मुकूट घातला. (chief minister tirath singh rawat)

देहरादून - उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर. आता भाजपने तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली आहे. तीरथ सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेल्या सतपाल महाराज यांच्यासाठी तीरथ सिंह रावत यांचे तिकीट कापले होते. (Uttarakhand politics BJP Political career of chief minister tirath singh rawat)

तिकीट कापले गेल्यानंतरही तीरथ सिंह यांनी ना पक्ष सोडला ना बंडखोरी केली. उलट सतपाल महाराज यांना जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यामुळेच आता भाजपने त्यांना आधी लोकसभेचे तिकीट दिले आणि आता मुख्यमंत्री पदाचा मुकूट घातला.

अभावीपच्या माध्यमाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात - तीरथ सिंह रावत भलेही संघाशी जोडले गेलेले असोत अथवा अभावीपच्या माध्यमाने त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली असो. पण, बीएस खंडूरी यांचे बोट धरून त्यांनी राजकीय वाटचाल केली आहे. पौडी-गढवाल मतदार संघातून खंडूरी यांनी जेव्हा-जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा-तेव्हा तीरथ सिंह यांनी त्यांच्या निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. ९०च्या दशकात बीएस खंडूरी आणि तीरथ सिंह रावत यांची जवळीक वाढली आणि यानंतर ते राजकारणात एकमेकांसाठी पुरक ठरले.

खंडूरी यांच्या पुढाकारानेच रावत यांना कॅबिनेटमध्येही मिळालं स्थान -1997 मध्ये बीएस खंडूरी यांनी तीरथ सिंह रावत यांना एमएलसीचे तिकीट मिळावे म्हणून संपूर्ण जोर लावला होता. यानंतर ते जिंकूण विधान परिषदेतही पोहोचले होते. खंडूरी हे केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. तर 2000 मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. यानंतर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नित्यानंद मुख्यमंत्री झाले होते. यानंतर खंडूरी यांच्या पुढाकारानेच रावत यांना कॅबिनेटमध्येही स्थान मिळाले होते.

2008मध्ये चौबट्टाखाल मतदारसंघ तयार झाला. 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तीरथ सिंह रावत निवडून आले होते. या निवडणुकीत खंडुरींसह अनेक मातब्बर नेते पराभूत झाले होते. मात्र, 2017 मद्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज भाजपत आल्याने तीरथ सिंहांचे तिकीट कापण्यात आले होते.

संघटनेत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी -यानंतर, पक्षाने तीरथ यांना संघटनेत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आणि हिमाचल प्रदेशचे प्रभारी बनवले. चौबट्टाखाल सीटवर सतपाल महाराज यांना जिंकूण देण्यात तीरथ सिंह यांची मोठी भूमिका होती. यावेळी सतपाल महाराज उत्तराखंड सरकारमध्ये पर्यटन मंत्री झाले होते. यानंतर भाजपने 2019मध्ये तीरथ सिंह यांना पौडी-गढवाल येथून लोकसभेचे तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी आपले राजकीय गुरू बीएस खंडुरी यांचा मुलगा मनीष खंडूरी यांना तीन लाख मतांनी पराभूत केला होते.

तीरथ सिंह रावत यांना केंद्रीय राजकारणात जाऊन अद्याप केवळ दीड वर्षच झाले होते -तीरथ सिंह रावत यांना केंद्रीय राजकारणात जाऊन अद्याप केवळ दीड वर्षच झाले आहे. मात्र, उत्तराखंडमध्ये आमदारांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विरोधात बंडाचा बिगूल वाजवल्याने भाजपने त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितले आणि संघाची पृष्ठभूमी आणि संघटना तसेच सरकारमधील अनुभव यांचा विचार करत तीरथ सिंह रावत यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविले.

टॅग्स :BJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री