नैनीतालमधील कैंची धामजवळ भीषण अपघात झाला. अल्मोडाहून हल्द्वानीला लग्नासाठी जाणाऱ्या लोकांची कार ६० मीटर खोल दरीत पडली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
शनिवारी रात्री खैरना पोलीस चौकीला कैंची धामजवळ एक एसयूव्ही दरीत पडल्याची माहिती मिळाली. कारमध्ये चार जण होते.एसडीआरएफ चौकी खैरना येथील निरीक्षक राजेश जोशी यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. रतीघाट नावाच्या ठिकाणी गाडी खोल दरीत पडल्याचं आढळून आलं. ही गाडी अल्मोडाहून हल्द्वानीला जात होती.
एसडीआरएफ पथकाला घटनास्थळी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. दरी खूपच खोल होती, डोंगराळ प्रदेश खडबडीत होता आणि रात्रीच्या दाट अंधारामुळे बचावकार्य आणखी कठीण झाले. तरीही वेळ वाया न घालवता ऑपरेशन सुरू केलं. पथकाला गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी दोरी आणि स्ट्रेचरचा वापर करावा लागला.
बचाव पथकाला दरीत एक जखमी व्यक्ती आढळली, ज्याला १०८ रुग्णवाहिकेने सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. मनोज कुमार असं जखमी व्यक्तीं नाव आहे, जो अल्मोडा येथील रहिवासी आहे. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एसडीआरएफ पथकाने खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A car carrying wedding attendees plunged into a 60-meter deep valley near Nainital, killing three and injuring one. Rescue teams faced challenging conditions recovering the victims. Police are investigating.
Web Summary : नैनीताल के पास एक शादी समारोह में जा रही कार 60 मीटर गहरी खाई में गिर गई, जिससे तीन लोगों की मौत हो गई और एक घायल हो गया। बचाव दल ने मुश्किल परिस्थितियों में पीड़ितों को निकाला। पुलिस जांच कर रही है।