शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

उत्तराखंडात पेटलेल्या वणव्यामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवली, भाविक निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 12:00 IST

पर्वतीय रांगा, दऱ्याखोऱ्यांतून खडतर वाट पार करत भक्तिभावानं वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांना देवीचं दर्शन न घेता माघारी फिरावं लागल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ऋषिकेश - पर्वतीय रांगा, दऱ्याखोऱ्यांतून खडतर वाट पार करत भक्तिभावानं वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवीचं दर्शन न घेताच माघारी फिरावं लागत असल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. उत्तराखंडातील जंगलांमध्ये गेल्या सात दिवसांपासून पेटलेल्या वणव्यामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जंगलात पेटलेला वणवा मोठ्या प्रमाणात पसरत असल्यानं परिसरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सात दिवसांपूर्वी पेटलेला वणव्याचे रौंद्र रुप पाहता परिसरात चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडातून हा वणवा आता पुढे हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या दिशेनं पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे.  

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तराखंड सरकार अथक प्रयत्न करत आहे. यासाठी अधिकतर अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात येत आहे. एसडीआरएफची टीम आग आटोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. एवढे प्रयत्न सुरू असतानाही आगीवर नियंत्रण मिळण्यास मात्र अपयश येत आहे. आता शिमलाच्या आसपास परिसरातही भीषण आग पसरल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय, जम्मू परिसरातील वैष्णो देवीच्या पर्वतीय रांगांमध्ये हिमकोट आणि सांझी परिसरातील जंगलातही वणवा पसरला आहे. आगीच्या धुरांच्या लोटांमुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना श्वास घेणे कठीण होत आहे.

वाढत्या आगीचा धोका लक्षात घेता कटरापासून भवनपर्यंत वैष्णो देवीची यात्रा थांबवण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं हवाई दलाची मदत घेतली आहे. यादरम्यान, हवामान विभागानं वातावरणात भीषण उष्मा वाढण्याचाही इशारा जारी केला आहे. उन्हाळ्यांमध्ये उत्तराखंडातील जंगलांमध्ये आग लागणे, ही नवीन बाब नाही. मात्र, अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान होत आहे. शिवाय, आगीमुळे येथील नागरिक व जनावरांना आगीचा तडाखा सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfireआग