शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Election Opinion Poll: सत्ता भाजपची, पण मुख्यमंत्री काँग्रेसचा; 'या' राज्यात मतदारांची भलतीच इच्छा, नेते चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 22:10 IST

Uttarakhand Election Opinion Poll: निवडणूकपूर्व सर्वेक्षण सांगते, राज्यात भाजपची सत्ता कायम राहणार; पण मुख्यमंत्रिपदी हवा काँग्रेस नेता

देहरादून: पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या साडे चार वर्षांत भाजपनं तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी टाळण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री बदलले गेले. त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. त्यातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.

साडे चार वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपला पराभवाची चिंता सतावत असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र सर्वेक्षणातील आकडेवारीतून याच्या अगदी विरुद्ध चित्र समोर आलं आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल, असं आकडे सांगतात. विधानसभा निवडणुकीत भाजपला ४५ टक्के, तर काँग्रेसला ३४ टक्के मतं मिळू शकतात. आम आदमी पक्षाला १५, तर अन्य पक्षांना ६ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.

कोणाला किती जागा?उत्तराखंड विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. यापैकी ४२ ते ४६ जागा भाजपला मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला २१ ते २५ आणि आपला ० ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना ० ते २ जागा मिळू शकतील.

मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?उत्तराखंडातील जनतेनं या वर्षात ३ मुख्यमंत्री पाहिले. देवभूमीत असं अनेकदा घडलं आहे. काँग्रेस, भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. राज्यात भाजपचं सरकार येईल असं सर्व्हेतील आकडे सांगतात. मात्र मुख्यमंत्रीपदी जनतेनं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना पसंती दिली आहे. रावत मुख्यमंत्री व्हावेत, असं ३७ टक्के लोकांना वाटतं. तर पुष्कर धामीच मुख्यमंत्रिपदी कायम राहावेत, असं वाटणाऱ्यांचं प्रमाण २४ टक्के आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस