शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Corona Vaccination: मद्यपान केल्यानंतर डॉक्टरांनी टोचून घेतली कोरोना लस; प्रकृती बिघडल्यानं खळबळ

By कुणाल गवाणकर | Published: January 19, 2021 2:22 PM

Corona Vaccination: डॉक्टरांवर रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृती स्थिर

देहरादून: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (१६ जानेवारी) देशातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरणास सुरुवात झाली. लस टोचण्यात आल्यानंतर आतापर्यंत देशात दोघांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नसल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. लस टोचण्यात आल्यानंतर ५०० हून अधिक जणांना साईड इफेक्ट्स जाणवले. मात्र यातील कोणाचीही स्थिती चिंताजनक नाही.देहरादूनमधील गव्हर्नमेंट दून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे (जीडीएमसीएच) चिकित्सा अधिकारी डॉ. के. के. टम्टा यांना शनिवारी कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना भोवळ येत होती. लस देण्यात आल्यानंतर डॉक्टरांची तब्येत बिघडल्यामुळे एकच खळबळ उडाली. इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडल्यानं डॉक्टरांची प्रकृती खराब झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. शनिवारी डॉक्टरांना कोरोना लस देण्यात आली. त्याच दिवशी त्यांनी जास्त प्रमाणात मद्य प्राशन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडल्यानं त्यांची प्रकृती खराब झाली, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांना देण्यात आलेल्या लसीमुळे त्यांची प्रकृती बिघडली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.जीडीएमसीएचचे प्रमुख डॉ. आशुतोष सयाना यांनी के. के. टम्टा यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती दिली. 'टम्टा यांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे (सीएमओ) त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती दिली आहे. टम्टा यांची प्रकृती चिंताजनक नाही. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,' असं सयाना यांनी सांगितलं.डॉक्टरांना देण्यात आलेल्या डोजचं प्रमाण अधिकशनिवारी कोरोना लस दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या यादीत डॉ. टम्टा यांचं नाव नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 'त्या दिवशी एक अधिकचा डोज उपलब्ध होता. तो टम्टा यांना देण्यात आला. लसीच्या एक बाटलीत ५ मिलीलीटर डोज असतो. हा डोज १० जणांना देण्यात येतो. मात्र काही बाटल्यांमध्ये ५.०५ मिलीटर डोज असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्याच अधिकच्या डोजमधून डॉ. टम्टा यांना लस दिली गेली,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस