उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन    

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:38 PM2021-03-22T13:38:53+5:302021-03-22T13:39:50+5:30

Uttarakhand CM Tirath Singh Rawat tests corona positive : अलीकडेच तीरथ सिंह रावत हे कुंभ मेळाव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते.

Uttarakhand CM Tirath Singh Rawat tweets that he has tested positive for Covid-19 | उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन    

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन    

Next

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat)  यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांनी ट्विट करून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसेच, तीरथ सिंह रावत यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. (Uttarakhand CM Tirath Singh Rawat tweets that he has tested positive for Covid-19)

"माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी ठिक आहे आणि मला कोणताही त्रास नाही. डॉक्टरांच्या देखरेखीत मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत तुमच्यापैकी कोणतीही व्यक्ती माझ्या संपर्कात आली आहे. त्यांनी काळजी घ्यावी आणि स्वत:ची कोरोना चाचणी करावी", असे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अलीकडेच तीरथ सिंह रावत हे कुंभ मेळाव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते. तसेच, रविवारीही त्यांनी एका खेळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याशिवाय, तीरथ सिंह रावत हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते, असे सांगण्यात येत आहे.

("CM साहेब... विचार बदला, तेव्हाच देश बदलेल"; तीरथ सिंह रावतांच्या फाटलेल्या जीन्स विधानावरून हल्लाबोल)

वादग्रस्त विधानामुळे चर्चेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत. तीरथ सिंह रावत हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत," असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले होते. यावरून विरोधी पक्षांनी निशाणा साधत तीरथ सिंह रावत यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

 

Web Title: Uttarakhand CM Tirath Singh Rawat tweets that he has tested positive for Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.