शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल", मुख्यमंत्री धामी यांनी योग दिनानिमित्त दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:08 IST

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जागेश्वर धाम येथे जाऊन राज्यात योगाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकसित होणार असल्याचे प्रतिपादन केले.

देहरादून : आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी  योग दिनानिमित्त वेगवेगळी योगासने करून तंदुरूस्त राहण्यासाठी योग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तउत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जागेश्वर धाम येथे जाऊन राज्यात 'योगा'च्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकसित होणार असल्याचे प्रतिपादन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मोदी यांनी विकासासाठी नव्या रत्नांमध्ये समाविष्ट केलेले तिसरे रत्न मानखंड क्षेत्र निवडले असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम अल्मोडा येथील जागेश्वर धाम येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विशेष पुढाकाराने योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 "जागेश्वर धाम आध्यात्मिक चैतन्याचे केंद्र बनेल"यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, 'मानस मंदिर माला' या मिशनच्या माध्यमातून सरकार कुमाऊंमधील प्राचीन मंदिरांमध्ये विविध सुविधा विकसित करत आहे. जागेश्वर धामपासून या योजनेची सुरुवात होत असून जागेश्वर धाम हे योग ध्यान आणि आध्यात्मिक चेतनेचे केंद्र बनवण्यात येणार आहे. 

योग हा ज्ञानाच्या रूपाने लाभलेला वारसा - धामी तसेच जागेश्वर धाममधील पाच संयोग सांगताना धामी यांनी म्हटले की, योग हा ज्ञानाच्या रूपाने वारसा असून त्याला आपण जपले पाहिजे. "योग हा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवेचा संयोग आहे. उत्तराखंडला प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट बनविण्यासाठी, पुढे नेण्यासाठी राज्यातील जनतेने दररोज एक तास योग करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. दररोज योगासने करा, सूर्योदयापूर्वी उठा आणि स्वत:मध्ये बदल करा, यामुळे औषधांवर होणारा खर्च देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले.

"वसुधैव कुटुंबकम’ संस्कृतीचा मूळ आधार"आपल्या गौरवशाली सनातन संस्कृतीचा मूळ आधार 'वसुधैव कुटुंबकम' आहे. हेच तत्त्व केंद्रस्थानी ठेवून यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच अनेक जागतिक आव्हाने आणि षड्यंत्रांचा सामना करूनही भारताने मानवी मूल्यांना कधी बाजूला केले नाही. आपल्या या लोककल्याणकारी संकल्पनेचा आधार ही आपली संस्कृती आहे, ज्याचा एक प्रमुख स्तंभ योग आहे. या कारणास्तव योग हा आज जगातील करोडो लोकांच्या दिनचर्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, जो जगाला भारतीय संस्कृतीशी अधिक खोलवर जोडण्याचे काम करत आहे, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आणखी सांगितले.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडChief Ministerमुख्यमंत्रीYogaयोगासने प्रकार व फायदेInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन