शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Uttarakhand Avalanche, Mountaineers Trapped: उत्तरकाशीमध्ये बर्फाच्या वादळामुळे शिखरावर अडकले २८ गिर्यारोहक, आतापर्यंत १० जणांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 3:09 PM

दांडा-2 पर्वत शिखरावर असताना घडली घटना

Uttarakhand Avalanche, Mountaineers Trapped: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे एक अतिशय मोठी घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तरकाशीमध्ये बर्फाच्या वादळामुळे अनेक गिर्यारोहक अडकल्याचे वृत्त आहे. २३ सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेतील ४० गिर्यारोहकांची टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर रवाना झाली होती. मंगळवारी येथेच हे सर्व जण हिमस्खलनात अडकले. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे प्रिंसिपल कर्नल बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ गिर्यारोहक वादळात अडकले असून त्यापैकी १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर हालांकि १८ गिर्यारोहक अद्यापही बेपत्ता आहेत.

अपघाताची माहिती मिळताच NIMच्या टीमसह जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्करी जवान आणि ITBP चे जवान सक्रिय झाले असून वेगाने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

"गिर्यारोहकांचा एक गट द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर जाण्यासाठी निघाला होता. हे शिखर समुद्रसपाटीपासून तब्बल १८ हजार फूट वर आहे. हे लोक तेथे असतानाच सकाळी ८ वाजताच्या सुमारास बर्फाचे वादळ आले आणि २९ गिर्यारोहक तेथे अडकले. त्यापैकी ८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे," असे ITBP चे जनसंपर्क अधिकारी विवेक पांडे म्हणाले होते.

"ITBP, NDRF, SDRF आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मदत व बचावकार्य सुरू केले आहे. माहिती मिळताच आम्ही सारे तेथे पोहोचलो असून शक्य तितक्या जलदगतीने सर्वांना सुखरूप सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अडकलेल्या आणि जखमी गिर्यारोहकांना हेलिपॅडजवळ नेले जात असून तेथून हेलिकॉप्टरने त्यांना ITBP च्या रुग्णालयात दाखल केले जात आहे", अशी माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAvalancheहिमस्खलनPoliceपोलिस