बनावट चकमकप्रकरणी उत्तराखंडचे 17 पोलीस दोषी
By Admin | Updated: June 6, 2014 22:34 IST2014-06-06T22:34:37+5:302014-06-06T22:34:37+5:30
डेहराडून येथे एमबीएचा विद्यार्थी रणबीरसिंग याची बनावट चकमकीत हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने उत्तराखंडच्या 17 पोलिसांना दोषी ठरविले आहे.

बनावट चकमकप्रकरणी उत्तराखंडचे 17 पोलीस दोषी
>नवी दिल्ली : डेहराडून येथे एमबीएचा विद्यार्थी रणबीरसिंग याची बनावट चकमकीत हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने उत्तराखंडच्या 17 पोलिसांना दोषी ठरविले आहे. जुलै 2क्क्9 मध्ये रणबीरसिंगला ठार करण्यात आल्यानंतर या संवेदनशील प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयने 18 पोलिसांविरुद्ध विविध गुन्हे नोंदवत आरोपपत्र दाखल केले होते. 9 जून रोजी सीबीआय न्यायालय याप्रकरणी शिक्षा ठोठावणार आहे.
अपहरण, हत्या, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करण्यासारखे आरोप होते. दोन पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस उपनिरीक्षकांचा दोषी ठरविलेल्यांमध्ये समावेश असून एका पोलिसाला पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी मानण्यात आले. याअगोदर सीबी-सीआयडीमार्फत तपास केला. रणबीरसिंग यांचे वडील रवींद्रसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता प्रकरण दिल्ली न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)