शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला भावाकडून बेदम मारहाण, मुलगी बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:18 IST

प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला तिच्याच भावाने बेदम मारहाण केली.

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये प्रियकराचा साखरपुडा मोडायला आलेल्या प्रेयसीला तिच्याच भावाने बेदम मारहाण केली. संबंधित प्रेयसी तिच्या प्रियकराच्या घराबाहेर आंदोलन करत होती असे सांगितले जात आहे. त्याचवेळी तिचा भाऊ देखील तिथे पोहोचला. त्याने बहिणीला समजावण्याचा  खूप प्रयत्न केला, पण तिने न ऐकल्याने भावाने तिला मारहाण केली. भावाने केलेल्या मारहाणीमुळे तरूणी बेशुद्ध झाली. पोलिसांचे म्हणणे आहे की, अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, तरीही या प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, ही घटना मेरठमधील रोहता पोलीस स्टेशन क्षेत्रातील सटवाई गावातील आहे. इथे एका मुलीचे रिंकू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. अशातच रिंकूचे नातेवाईक रिंकूचे इतरत्र लग्न करण्याचा विचार करत असल्याचे मुलीला समजले. मग संतापलेल्या तरूणीने प्रियकराचे घर गाठून त्याचा साखरपुडा मोडण्यासाठी धरणे आंदोलन करण्यासाठी त्याचे घर गाठले. 

तरूणीला भावाकडून बेदम मारहाण संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी पोहोचून तिला खूप समजावून सांगितले. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. यादरम्यान मुलीचा भाऊही तिथे पोहोचला होता. मग संतापलेला मुलीचा भाऊ आणि कुटुंबीयांनी मुलीला बेदम मारहाण केली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलगी गंभीर जखमी पोलीस अधिकारी ब्रिजेश सिंग यांनी सांगितले की, रोहताच्या सटवाई गावात एक मुलगी तिच्या प्रियकराच्या घरी धरणे धरून बसली होती. या मुद्द्यावरून वाद झाला आणि वाजाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अद्याप एकही अर्ज आलेला नाही. तरीदेखील कारवाई करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस