शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंख्याला हात लावताच विजेच्या जोरदार धक्का; चार सख्या भावंडांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 20:47 IST

या धक्कादायक घटनेने गावावर शोककळा पसरली.

उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील पंख्यामुळे विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ चारही मुलांना शॉक लागल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी चार भाऊ-बहिणीच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली. 

उन्नाव जिल्ह्यातील बारसगवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमन खेडा गावात ही घटना घडली. गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार यांच्या 9 वर्षीय मयंक, 2 वर्षीय हिमांशी, 6 वर्षीय हिमांक आणि 4 वर्षीय मानसीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व मृत मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले.

चारही मुले एकामागून एक पंख्याला चिकटलीरविवारी वीरेंद्र सिंह पत्नीसह शेतात गेले होते. त्यांची मुले घरीच होती. घरात पंखा लावला, त्यातून विद्युत प्रवाह येत होता. अचानक एका मुलाला पंख्याचा विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने तो ओरडू लागला. दुसऱ्या मुलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. यानंतर एक एक करून चारही मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. 

घरातून लहान मुलांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. मुलांचा वेदनादायक मृत्यू पाहून उपस्थितांनाही धक्का बसला. याची माहिती वीरेंद्र आणि त्यांच्या पत्नीला मिळताच त्यांनी आक्रोश केला. ज्या घराच्या अंगणात चिमुकले खेळायचे, त्याच घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू