शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीवर निकाल येण्यापूर्वी न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 19:41 IST

यासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. यानंतर सायबर टीम सक्रिय झाली आहे.

ज्ञानवापी-श्रृंगार गौरी खटल्याचा निकाल येण्यापूर्वी वाराणसी न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात धमकीचा फोन आला होता. मध्यरात्री ५ कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांने हा फोन उचलला होता. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने तू कुठून बोलत आहेस, असे विचारले असता. कॉल करणाऱ्याने कॉल कट केला. यासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. यानंतर सायबर टीम सक्रिय झाली.

यासंदर्भात लखनौ पोलिसांनी वाराणसी पोलिसांनाही माहिती दिली आहे. यानंतर, वाराणसी पोलिसांनी न्यायालयाची सुरक्षितताही वाढविली आहे. घटनेचा तपास करताना मोबाईल क्रमांक ट्रेस करताना सायबर टीम वाराणसीतील एका भाजी विक्रेत्यापर्यंत पोहोचली. यानंतर ताब्यात घेतलेल्या भाजी विक्रेत्याची चौकशी केली असती, त्याने आपला मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले. ज्या क्रमांकावरून कॉल आला तो क्रमांक भाजी विक्रेत्याच्या मुलीच्या नावावर आहे.

शिवलिंगाची एएसआयकडून तपासणी करण्याची मागणी -ज्ञानवापी-श्रृंगार गौरी खटल्यात 22 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह इतरांनी शिवलिंगाच्या आकृतीची एएसआई (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) तज्ज्ञांकडून कार्बन डेटिंग करण्याची मागणी न्यायालयात केली होती. यानंतर 29 सप्टेंबरला प्रकरणाची सुनावणी झाली.

निकालापूर्वी मिळाली धमकी - सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षानेही न्यायालयात आपली बाजू मांडली. शिवलिंगाची कार्बन डेटिंग होऊ नये. कारण हे शिवलिंग नसून फवारा आहे, असे मुस्लीम पक्षाने म्हटले आहे. दोन्ही पक्षांचे ऐकल्यानंतर, न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय सात ऑक्टोबरला आपला निर्णय सुनावणार आहे. असे असतानाच, वाराणसी न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. विशेष म्हणजे, अशी धमकी देणारा फोन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आला आहे. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCourtन्यायालय