शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हादरलं उत्तर प्रदेश; गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 23:40 IST

या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.

प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. एनएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला येता आले नाही. केवळ जवळच्या नातेवाईकांसह २५ जणांच्या उपस्थितीत असद अहमदचा दफनविधी पार पडला. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर, काही तासांतच अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांचीही हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथे रुग्णालयातून नेत असताना गँगवारच्या हल्ल्यात त्यांना ठार करण्यात आले. 

दरम्यान, असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस