शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

"बाबाच्या सेवेकऱ्याने धक्काबुक्की केली अन्..."; हाथरसमधल्या घटनेची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:54 IST

Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोक ठार झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याच्या प्रवचनासाठी आलेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेकरी देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे हाथरसचे उप जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली.

मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. या कार्यक्रमात दोन ते अडीच लाखाच्या आसपास भाविक आले होते. भोले बाबाचे प्रवचन संपल्यानंतर  त्याचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता भाविकांनी एकच गर्दी जमली. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२१ लोकांचा मृत्यू झाली तर अनेकजण जखमी झाले. आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत विस्तृत माहिती दिली.

"सत्संग सुरु असलेल्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजत नारायण साकार हरी (भोले बाबा) सत्संग मंडपात पोहोचले आणि हा कार्यक्रम एक तास चालला. त्यानंतर दुपारी १.४० च्या सुमारास नारायण साकार हरी (भोले बाबा) मंडपामधून बाहेर पडले. महामार्ग-९१ ज्या मार्गाने भोले बाबा बाहेर पडत होते. सत्संगी स्त्रिया/पुरुष/मुले इत्यादींनी त्याच्या पायाची माती घेऊन दर्शनाची खूण म्हणून कपाळावर लावली व चरणस्पर्श करून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्यावेळी बाजूला व मध्यभागी बांधलेल्या दुभाजकावर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी उभे होते. जी.टी.रोड, दुभाजकावरून जेव्हा लोक उड्या मारून बाबाच्या वाहनाकडे धावू लागले. गर्दी बाबांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी आणि सेवेकऱ्यांनी काही लोकांना धक्काबुक्की केली आणि ते खाली पडले. त्यामुळे तो जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि घाबरला. तिथून बाहेर पडण्यासाठी लोकांनी जवळच असलेल्या मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली जिथे अनेक लोक एका उतारावरुन घसरले आणि खाली पडले. इतर लोक त्यांच्या अंगावरुन धावू लागले. यामुळे ते पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत आणि गर्दी त्याच्या अंगावरुन इकडे तिकडे धावू लागली. ज्यामध्ये अनेक महिला, पुरुष आणि मुले जखमी/गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित महसूल व पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना रूग्णवाहिका व इतर माध्यमातून सिरळ येथील घटनास्थळाजवळील रूग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवले. जिथे ८९ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि काही भाविकांना उपचारासाठी एटा जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिथे २७ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशा प्रकारे, एकूण मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आणि एकूण २३ लोक जखमी झाले," अशी माहिती उपजिल्हाधिकारी सिकंदर राव यांनी दिली. 

दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस