शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजी, तर मेरठ-अलिगडमध्ये बसपाचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 23:09 IST

लखनऊ- उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे. महापौरपदाच्या 16 जागांपैकी अयोध्या आणि आग्र्यातील जागेवर भाजपाचा कब्जा केला आहे, तर इतर 12 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे आहे. बीएसपीनं अलिगड आणि मेरठमध्ये मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपानं एकूण 14 जागांवर विजय संपादन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दबदबा कायम ठेवला आहे.गोरखपूरमधल्या वॉर्ड क्रमांक 68च्या भाजपा उमेदवार माया त्रिपाठी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. या जागेवरून अपक्ष उमेदवार नादिर यांचा विजय झाला आहे. या वॉर्डातच गोरखनाथ मंदिर आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपाला विजय मिळाला आहे. नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच चार नगरपालिकेत कमळ उमललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचंही अभिनंदन केलं आहे. या निकालांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. देशात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विकास विजयी झाला आहे. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजय हा नोटाबंदी आणि जीएसटीचा अपप्रचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांची तोंडे आता तरी नक्कीच बंद होतील, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या विजयांमुळे तिथे महापौरही भाजपचाच बसणार आहे. फिरोजाबाद महापालिकेतही पहिल्यांदाच भाजपाचे नूतन राठोड यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे एमआयएमनं या निवडणुकीत खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेश पालिका निवडणुकीत 22, 26 आणि 29 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या पालिकेत 16 महापालिका, 198 नगरपालिका, 438 नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. 

टॅग्स :BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ