शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:51 IST

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरमधील घाटमपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज कुरील यांच्या नावाचा पास लावलेल्या कारने एक ई रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरमधील घाटमपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज कुरील यांच्या नावाचा पास लावलेल्या कारने एक ई रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिलालेल्या अधिक  माहितीनुसार कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वार तरुण रेल्वे पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळून गंभीर जखमी झाला. घटनास्थळी धाव घेललेल्या पोलीस आणि इतर लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र सदर रुग्णवाहिका वेळीच न पोहोचल्याने लोकांनी त्याला खाजगी वाहनामधून रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचं नाव आशू गुप्ता असं असून, तो भाजपाच्या एका नेत्याचा भाऊ होता.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक कार जप्त केली आहे. त्यामधून आमदारांचा पास आणि बियरची रिकामी बाटली जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे कारचालक कार नशा करून चालवत असल्याची शक्यता वर्तली जात आहे. दरम्यान, कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटवली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, या अपघातातील मृत तरुणाच्या भावाने आमदारावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना उन्नावचे पोलीस अधीक्षक दीपक बकर यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले. तरअपघातग्रस्त कार माझा ड्रायव्हर चालवत होता. तर अपघात झाला तेव्हा मी लखनौमध्ये होते, असे आमदार सरोज कुरील यांनी या अपघाताबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश