शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

मोठी बातमी: उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून प्रियांका गांधी असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? योगींना देणार थेट टक्कर

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 13, 2021 21:12 IST

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या शेतकरी रॅलीत सहभाग घेण्याबरोबर त्या पक्षाला 'राजकीय भोवऱ्यातून' बाहेर काढण्यासाठी प्रयागराजच्या संगमापर्यंतही पोहोचल्या. तेथे तीन डुबक्या मारून त्यांनी काँग्रेसची नाव तिराला लावण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीत प्रियांका गांधी स्वतःच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत.प्रियांका गांधी वाड्रा यांना काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याचे ठरविले आहे.

लखनौ -काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) सध्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसला संजिवनी देण्याच्या महाअभियानात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रियांका गांधी स्वतःच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यावेळी त्या योगी आदित्यनाथांना थेट टक्कर देतील. (Uttar Pradesh mission 2022 Priyanka Gandhi will be cm face from Congress)

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या शेतकरी रॅलीत सहभाग घेण्याबरोबर त्या पक्षाला 'राजकीय भोवऱ्यातून' बाहेर काढण्यासाठी प्रयागराजच्या संगमापर्यंतही पोहोचल्या. तेथे तीन डुबक्या मारून त्यांनी काँग्रेसची नाव तिराला लावण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे. प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना

जागरण डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गांधी वाड्रा यांना काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याचे ठरविले आहे. प्रियांका यांनी राज्याच्या प्रभारी पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे तसेच त्या सरकारशी सात्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत, की प्रियांका गांधी वाड्रा या विधानसभा निवडणूक  2022 मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यासंदर्बात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी आणि सामान्य नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याची प्रियांका यांची इच्छा आहे. संगमात स्वतःच नावेची धुरा सांभाळणे आणि काही दिवसांपूर्वी रामपूरच्या  रस्त्यावर स्वतःच गाडीचा आरसा पुसणे याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

2019 पासूनच उत्तर प्रदेशात सक्रिय -प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेशात प्रचंड सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. त्या उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाला धार देण्याचे कामही करत आहेत. एवढेच नाही, तर त्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेत असल्याचेही दिसत आहेत. खरेतर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्यापासून म्हणजे 2019 पासूनच त्या उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. आता त्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत. पुढील काळात त्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या जुन्या समर्थकांनाही भेटणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा