शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 : उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकाल; इंडिया आघाडीने घेतली आघाडी, आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 10:07 IST

Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या फेरीमध्ये फेरीमध्ये इंडिया आघाडीने आघाडी घेतली असून भाजपा पिछाडीवर आहे. इंडिया आघाडी ३७ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपाने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे. 

Varanasi Lok Sabha Result 2024: सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यूपीमध्ये एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला सपा आणि काँग्रेसची इंडिया आघाडी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने गेल्या दोन निवडणुकांमध्ये यूपीमध्ये जास्त जागांवर विजय मिळवला आहे. यावेळीही एनडीए उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत ७० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. मात्र, दुसरीकडे इंडिया आघाडीनेही विजयाचा दावा केला आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल समोर येत असल्याचे दिसत  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेसचे अजय राज आघाडीवर आहेत. अजय राय यांना आतापर्यंत ११,४८० मते मिळाली आहेत.राहुल गांधी आघाडीवर

काँग्रेसचे राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २१२६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी ३९५ मतांनी पिछाडीवर आहेत. सहारनपूरमधून काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद १०,१६३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सीतापूरमधून काँग्रेसचे राकेश राठोड ४३३१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराबंकीमधून काँग्रेसचे तनुज पुनिया १०९७ मतांनी आघाडीवर आहेत. 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा