शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

आज लक्ष्मणाच्या मूर्तीचे अनावरण; लवकरच शहराचे नाव बदलणार, लखनौ होणार 'लक्ष्मणपूर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 20:13 IST

गेल्या काही दिवसांपासून लखनौ शहराचे नाव पूर्वीप्रमाणे 'लक्ष्मणपूर' करण्याची मागणी होत आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे (Lucknow) नाव 'लखनपूर' किंवा 'लक्ष्मणपूर' असे ठेवण्याच्या मागणीवरुन राजकारण तापले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने (BJP) या दिशेने पुढे जाण्याचे स्पष्ट केले आहे. तर, 'भाजपकडे दुसरं काही काम नाही. असे डावपेच अवलंबून भाजपला देशाचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे. भाजप लक्ष देश विकण्यावरच आहे, असा आरोप समाजवादी पक्षाने (SP) केला आहे. आता लखनौचे नाव बदलण्यावरुन भाजप आणि सपा आमने-सामने आले आहेत.

लखनौमध्ये 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील दिग्गज उद्योगपती सहभागी होत आहेत. यातच अमौसी विमानतळावर उतरताच लोकांना लक्ष्मणाची भव्य मूर्ती पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी लक्ष्मणजींच्या 20 फूट उंच आणि 1200 किलो वजनाच्या विशाल पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी 50 लाख खर्च करुन ही मूर्ती तयार केली आहे. पुतळ्याच्या उद्घाटनासोबतच भाजपने एका दगडात दोन लक्ष्य साधण्याची तयारी केली आहे. भाजपने लखनौचे नाव बदलण्याची कसरत सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. 

उपमुख्यमंत्री काय म्हणाले?बुधवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वी या शहराचे नाव 'लक्ष्मण नगरी' होते, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता परिस्थितीनुसार कारवाई केली जाईल. भाजपचे मंत्री संजय निषाद म्हणतात की, लखनौचे नाव बदलून लखनपुरी केले तर त्यात गैर काय? आपली सभ्यता जिवंत ठेवण्याची गरज आहे. तर, प्रतापगडचे भाजप खासदार संगम लाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर किंवा लखनपूर करण्याची मागणी केली. 18 व्या शतकात नवाब असफुद्दौलाने शहराचे नाव बदलून लखनौ केले होते.

टॅग्स :lucknow-pcलखनऊyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा