शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दूध देणं बंद झाल्यानंतर गायीला सोडलं तर शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा; योगी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 21:12 IST

Uttar pradesh: "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.”

बेवारस जणावरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आज योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दूध देणे बंद झाल्यानंतर, गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. अशा शेतकऱ्यांविरुद्ध   प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे यूपी सरकारने म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह म्हणाले, "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.” ते विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सपा आमदार अवधेश प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

प्रसाद यांनी, भटक्या प्राण्यांच्या समस्येसंदर्भातील योजना आणि त्यांच्या मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसंदर्भात प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले, ही भटकी जनावरे नाहीत, त्यांना सोडण्यात आले आहे. त्यांना कोणी सोडले हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा एक गाय दूध देते तेव्हा तीचे संगोपन केले जाते आणि जेव्हा ती दूध देणे बंद करते तेव्हा तिला सोडून दिले जाते.''

याशिवाय, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत 15 मेपर्यंत 6,187 गो निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात तब्बल 8,38,015 जनावरांना ठेवण्यात आले आहेत, असेही धरमपाल सिंह यांनी सागितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथcowगायAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार