शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Election 2022: पितळी मुरादाबादचा चषक कुणाकडे?; सपाचे वर्चस्व असलेल्या मुरादाबादमध्ये भाजपचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 06:44 IST

मुरादाबाद जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ मतदारसंघांत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत

मनोज मुळ्येमुरादाबाद (उत्तर प्रदेश) : पितळी शहर म्हणून ओळख असलेल्या आणि पितळीवरील नक्षीकाम तसेच विविध प्रकारच्या चषकांसाठी (ट्रॉफीज) प्रसिद्ध असलेल्या मोरादाबाद जिल्ह्यात सत्तेसाठी जोरदार झुंज सुरू आहे. या जिल्ह्यात असलेल्या समाजवादी पार्टीच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप, सपा, एमआयएमसोबतच काँग्रेसनेही मोरादाबादसह लगतच्या जिल्ह्यात प्रचारावर भर दिला आहे.

मुरादाबाद जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ मतदारसंघांत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. एक मतदारसंघ भाजपकडे तर एक मतदारसंघ पीस पार्टीकडे आहे. १४ फेब्रुवारी कोडी या जिल्ह्यात मतदान होत आहे. आता प्रचाराला दोनच दिवस हातात असल्याने सर्व राजकीय पक्षांनी या मतदारसंघात जोर लावला आहे. या भागात मिळत असलेले अपयश भरून काढण्यासाठी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष लक्ष दिले आहे.

‘ये नगरी पित्तल दी’ मुरादाबादची मुख्य ओळख ही येथील पितळीवरील कलाकुसरीमुळे आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल पितळीवरील कलाकुसरीच्या वस्तूंच्या विक्रीतून होत आहे. २०१८मध्ये ही उलाढाल ९ हजार कोटी रुपये इतकी होती. त्यातील केवळ परदेशी निर्यातीतूनच ५४०० कोटींची उलाढाल झाली हाेती. म्हणूनच मोरादाबादला पितळी शहर म्हणूनही ओळखले जाते. 

अखिलेश यादव, जयंत चौधरी आज रामपूरमध्ये

भाजपने या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावल्याने सपानेही त्याची दखल घेतली आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १२ रोजी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच त्यांच्याशी आघाडी असलेले राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चाैधरी रामपूरमध्ये येत आहेत. प्रचार आणि एकूण वातावरणनिर्मितीत या जिल्ह्यात काँग्रेस खूप मागे असली तरी काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी गुरुवारी मोरादाबादमध्ये जनसंपर्क रॅली काढली.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी