शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Election 2022: हिंदुत्वाचा मुद्दा चालेना; काँग्रेसचा गड भेदण्यासाठी भाजपची यंदा पुन्हा फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 07:47 IST

भर रोजगारावर, महाराष्ट्रातील नेते तळ ठोकून

गजानन चोपडे

रामपूर खास : उत्तर प्रदेशातील प्रतापगढ म्हणजे बाहुबली राजाभय्याच्या प्रभावाखाली असलेला जिल्हा. त्यातील रामपूर खास हा मतदारसंघ म्हणजे गेल्या ४२ वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला. प्रमोद तिवारी यांनी अनेक वर्षे या मतदाराचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता कन्येला उत्तराधिकारी नेमले. येथून काँग्रेसचा निर्विवाद विजय होत असला तरी गेल्या निवडणुकीत मताधिक्य घसरल्याने यंदा भाजपने रामपूर खासला टार्गेट केले आहे. हिंदुत्व कुचकामी ठरत असल्याने भाजप रोजगाराच्या मुद्द्यावर रिंगणात आहे. उत्तर प्रदेशात आधीच काँग्रेसचे संघटन कमजोर होत असताना रामपूर खास ही प्रतिष्ठेची जागा वाचविणे पक्षापुढे खरे आव्हान आहे, अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले भाजप उमेदवार यंदा जंग जंग पछाडत आहेत. जातीय समीकरणात न अडकणारा हा मतदारसंघ कायम काँग्रेससोबत असल्याने भाजपला ही जागा वाटते तेवढी सोपी नसल्याचे बोलले जाते. 

पाशा पटेल यांचे ठाणभाजप नेते पाशा पटेल यांना केंद्रीय नेतृत्वाने रामपूर खास आणि बाबागंज या दोन मतदारसंघांची जबाबदारी सोपविली असून, काँग्रेसला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. महाराष्ट्रातून १० ते १५ नेत्यांची टीम उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चा सांभाळत असल्याचे पाशा पटेल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रामपूर खासमध्ये कमळ फुलल्यास बांबूपासून इथेनॉल तयार करणारा एक हजार कोटींचा प्रकल्प या क्षेत्रात उभारण्याचे आश्वासन पाशा पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने दिले असल्याचे  गोविंद दुबे म्हणाले. 

जुनेच प्रतिस्पर्धी मैदानातकाँग्रेसच्या आराधना मिश्रा मोना या विद्यमान आमदार असून, भाजपचे नागेश प्रताप सिंह ऊर्फ छोटे सरकार यांच्यात काट्याची टक्कर आहे. आजवर ५० हजार ते ३१ हजारांचे मताधिक्य काँग्रेसला मिळायचे. मात्र गेल्या निवडणुकीत आराधना १७ हजारच्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपचे मनोबल वाढले आहे. 

डबल इंजिन गौण या मतदारसंघात मोदी व  योगी यांच्या डबल इंजिन सरकारच्या हिंदुत्वाचा मुद्दा येथे गौण आहे. मुस्लीम मते २० हजारांच्या घरात असून, ब्राह्मण, दलित, कुर्मी, यादव, ठाकूर यांच्या मतांची संख्या फार मोठी आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस